Headlines News :

topads

Home » » २जी प्रकरणी अनिल अंबानींना क्लीन चीट

२जी प्रकरणी अनिल अंबानींना क्लीन चीट

Written By Admin on Monday, October 3, 2011 | 9:01 AM

स्रोत: तरुण भारत
नवी दिल्ली, ३ ऑक्टोबर
२जी स्पेक्ट्रम घोटाळाप्रकरणी रिलायन्स कम्युनिकेशन्सचे अनिल अंबानी यांना सीबीआयने क्लीन चीट दिली आहे. स्पेक्ट्रम लायसन्स मिळालेल्या स्वान टेलिकॉम कंपनीला निधीच्या हस्तांतरप्रकरणी तसेच विविध कंपन्यांच्या पुनर्रचनेसंदर्भात अनिल अंबानींचा हस्तक्षेप नसल्याचे स्पष्ट करत सीबीआयने त्यांना क्लीन चीट दिली आहे.
सीबीआयने २९ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात अंबांनींविरोधात कोणताही ठोस पुरावा मिळाला नसल्याचे नमूद केले आहे. रिलायन्स एडीएजीचे स्वान टेलिकॉममध्ये ९.९ टक्के भागभांडवल आहे. तसेच टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स आघाडीची कंपनी असल्यामुळे स्वान टेलिकॉम परवान्यासाठी पात्र नव्हती.
याच घोटाळाप्रकरणी गौतम दोशी, सुरेंद्र पिपारा आणि हरी नायर यांना अटक करण्यात आली आहे.
Share this article :

0 comments:

Speak up your mind

Tell us what you're thinking... !

Advertise

 
Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Proudly powered by Blogger
Copyright © 2011. HINDU TRIBUNE - All Rights Reserved
Template Design by Creating Website Published by Mas Template