Headlines News :

topads

Home » , , , » आफ्रिदीचं डोकं फिरलंयः दादा गांगुली

आफ्रिदीचं डोकं फिरलंयः दादा गांगुली

Written By Admin on Monday, October 3, 2011 | 9:24 AM

कोलकाता - शोएब अख्तरची बॉलिंग खेळताना सचिनचे पाय लटपटताना आपण पाहिलेत, असा दावा करणा-या शाहिद आफ्रिदीला ‘दादा’ सौरव गांगुलीनं एकाच वाक्यात उडवून लावलंय. आफ्रिदीचं डोकं फिरलंय, असा ‘स्ट्रेट ड्राइव्ह’ हाणून दादानं हा विषयच मिटवून टाकलाय.
‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ म्हणून ओळखल्या जाणा-या शोएब अख्तरचं 'काँट्रव्हर्शली युवर्स ' हे आत्मचरित्र भारीच वादग्रस्त ठरलंय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर माझी बॉलिंग खेळताना घाबरायचा, अशी गरळ शोएबनं आपल्या पुस्तकात ओकली होती. पण हे विधान त्याच्याच अंगाशी आलं होतं. सगळ्यांच रथी-महारथी क्रिकटपटूंनी त्याला अक्षरशः फोडून काढलं होतं. असं असताना, काल पाकचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी त्याच्या पाठीशी उभा राहिला आणि शोएब बोलतोय त्यात तथ्य असल्याची प्रतिक्रिया त्यानं दिली.
शोएबचा सामना करताना सचिनचे पाय अक्षरशः कापत असल्याचं मी फिल्डिंग करताना पाहिलंय, असा शाहिद आफ्रिदीनं केला होता. त्याबद्दल गांगुलीला विचारलं असता, आफ्रिदीचं डोकं फिरलंय अशी प्रतिक्रिया त्यानं दिली.
दरम्यान, भारताचा ऑफ स्पिनर हरभजनसिंगला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन वनडे सामन्यांतून वगळण्याचं ‘दादा’ ला फारसं आश्चर्य वाटत नाहीए. भज्जीच्या खराब फॉर्ममुळेच त्याला संघात स्थान मिळालं नसावं, असं त्यानं नमूद केलं. परंतु, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत हरभजशिवाय खेळणं शक्यच नसल्याचं सांगत त्यानं भज्जीच्या क्षमतेबद्दल विश्वास व्यक्त केला.
Share this article :

0 comments:

Speak up your mind

Tell us what you're thinking... !

Advertise

 
Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Proudly powered by Blogger
Copyright © 2011. HINDU TRIBUNE - All Rights Reserved
Template Design by Creating Website Published by Mas Template